SRA चा घर विक्रीविषयी नवा कायदा पहा हा व्हिडीओ | Lokmat Marathi Videos

2021-09-13 2

मुंबईतील संक्रमण शिबिरांतील घुसखोरांना घरे देण्यासाठी एकीकडे कायद्यात बदल करण्याच्या हालचाली सुरू असताना, दुसरीकडे एसआरए इमारतींमधील घरांची दहा वर्षे पूर्ण होण्याच्या आधीच केलेल्या विक्री व्यवहारांनाही मान्यता मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे एसआरए इमारतींमध्ये घर विकत घेतलेल्या आणि घर विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या असंख्य रहिवाशांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दंडात्मक कारवाई करून ही घरे अधिकृत करण्यासाठी राज्य सरकारने उपसमिती नेमली असून, यावर सकारात्मक निर्णय होण्याचा विश्वास ‘एसआरए’तील सूत्रांनी व्यक्त केला आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires